हस्ताक्षर, परिच्छेद अनुवाद परीक्षेत रोहित, स्वरदा प्रथम
21315
हस्ताक्षर, परिच्छेद अनुवाद
परीक्षेत रोहित, स्वरदा प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : येथील नगर वाचन मंदिरतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत रोहित डिचोलकर, तर परिच्छेद अनुवाद स्पर्धेत स्वरदा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन वाचन कक्षात भरवले होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपाल संजय शिदे यांनी प्रास्ताविक व स्वागताने केली. विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात द्वितीय अनिमिष पवार, तृतीय आर्या फोंडेकर, उत्तेजनार्थ प्रथम मीरा वराडकर, द्वितीय मयुरी मेस्त्री, परिच्छेद अनुवाद स्पर्धेत आठवी ते दहावी गटात द्वितीय तन्मय परब, तृतीय मानस परब, उत्तेजनार्थ प्रथम मानसी मसुरकर, द्वितीय दिव्या काशिराम परब यांनी यश मिळविले. प्रदीप सामंत, संजय शिदे, श्रेया चव्हाण यांनी परीक्षण केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक व पालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

