उन्मेषा दाभोलकर यांना
‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

उन्मेषा दाभोलकर यांना ‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

Published on

29679

उन्मेषा दाभोलकर यांना
‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ. ता. ९ : केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला विभाग राज्य उपाध्यक्ष उन्मेषा दाभोलकर यांना पुणे येथे ‘सावित्रीबाई फुले नारीशक्ती सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (महिला विभाग) डॉ. ज्योती गुरव यांनी पुणे येथील शिवाजीनगरमधील रोकडोबा सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले नारीशक्ती सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये उन्मेषा दाभोलकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांनाही हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र-गोवा संपर्क प्रमुख सतीश पाथरुड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com