स्त्री म्हणजे मानवी महात्म्याचे प्रतीक

स्त्री म्हणजे मानवी महात्म्याचे प्रतीक

Published on

swt103.jpg
29918
सावंतवाडी ः भारतीय बौद्ध महासभेतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्त्री म्हणजे मानवी महात्म्याचे प्रतीक
प्रा. सुषमा हरकुळकर ः सावंतवाडीत बौध्द महासभेतर्फे महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः स्त्री ही आदिम काळापासून कर्तृत्ववान ठरली आहे. स्त्री आहे म्हणून जग आहे. स्त्रीमुळेच माणसाचे महात्म्य टिकून आहे. म्हणूनच स्त्री हीच शोधाची खरी जननी आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रा. सुषमा हरकुळकर यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा व महिला विभाग यांच्यावतीने येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात रविवारी (ता. ९) महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी हरकुळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका महिलाध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध व सर्व महानायकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विचार पीठावर केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर, अशोक कदम, तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा संघटक ममता जाधव, गौतमी कांबळे, मानसी कदम, रुपाली जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी तालुका कोषाध्यक्ष अश्विनी जाधव यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या. त्यामध्ये रुक्मिणी जाधव (आरोंदा), सत्यवती जाधव (कारिवडे), जयश्री जाधव (माजगाव), रुक्मिणी कदम (सांगेली), अनुसया जाधव (इन्सुली), लीलावती जाधव (सातार्डा), लक्ष्मीनारायण कदम (माणगाव), सुहासिनी जाधव (कारिवडे), चंद्रकला जाधव (साटेली) यांना गौरविण्यात आले. महिलांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये प्रथम क्रमांक दिव्या जाधव (आंबोली), द्वितीय सुप्रिया जाधव (इन्सुली), तृतीय विदेशा जाधव (मळगाव), उत्तेजनार्थ प्राची मेश्राम (तळवणे), श्रद्धा असनकर यांना गौरविण्यात आले. मानसी कदम, ममता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गौतमी कांबळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com