सक्षम महिला देशाच्या प्रगतीचे लक्षण

सक्षम महिला देशाच्या प्रगतीचे लक्षण

Published on

swt127.jpg
30427
फणसगाव ः महिला दिन कार्यक्रमात ६९ वर्षीय जयश्री पाटणकर या कबड्डी खेळाडूचा सर्व संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सक्षम महिला देशाच्या प्रगतीचे लक्षण
प्रगती चव्हाण ः फणसगाव महाविद्यालयात महिला दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसून समाजाच्या प्रगतीची खरी शक्ती आहे. महिला सक्षमीकरण हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या व्याख्यात्या प्रगती चव्हाण यांनी केले.
फणसगाव येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालय, महिला विकास कक्ष आणि जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर यांच्यावतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे एका साध्या कागदाला विशिष्ट आकार दिला की त्याचे मूल्य वाढते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आपले मूल्य वाढवले पाहिजे. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे.’’
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका नारकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या अनुश्री नारकर यांनी प्रास्ताविकात स्त्रीच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला संघाचा सत्कार करण्यात आला. विशेषतः ६९ वर्षीय जयश्री पाटणकर यांचा कबड्डीतील सहभाग सर्व महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. या संघाचे नेतृत्व अंगणवाडी सेविका सायली नारकर यांनी केले. व्यासपीठावर समुदाय संसाधन व्यक्ती (बचतगट) मनीषा नारकर, अंगणवाडी सेविका सायली नारकर, इंग्रजी विभागप्रमुख ज्योत्स्ना कदम, इतिहास विभागप्रमुख विनायक जमदाडे, वाणिज्य विभागप्रमुख आशिष ढेकणे उपस्थित होते. सुचिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जान्हवी नारकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com