शिवसैनिकाकडून मुलीचे नामकरण ‘शिवसेना’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिकाकडून मुलीचे नामकरण ‘शिवसेना’
शिवसैनिकाकडून मुलीचे नामकरण ‘शिवसेना’

शिवसैनिकाकडून मुलीचे नामकरण ‘शिवसेना’

sakal_logo
By

मुलीचे नाव ठेवले ‘शिवसेना’
महाड : राज्यातील राजकीय कलहानंतर ‘शिवसेना’ या नावावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असणाऱ्या महाड तालुक्यातील एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव ‘शिवसेना’ असे ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण केली. तालुक्यातील गोठवली येथे राहणारे पांडुरंग वाडकर यांच्या पत्नीने नुकताच एका कन्येला जन्म दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वाडकर दाम्पत्याने आपल्या मुलीचा नामकरण सोहळादेखील आयोजित केला होता. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कट्टर समर्थक असलेल्या पांडुरंग वाडकर यांनी या आपल्या मुलीचे ‘शिवसेना’ असे नामकरण करून बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति असलेली आपली निष्ठा व्यक्त केली.