पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस
पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस

पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस

sakal_logo
By

पाच जिल्ह्यात बुस्टर पूर्ण
मुंबई : राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि जळगाव अशा पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे. पाचही जिल्ह्यांत बूस्टर डोसची मोहीम पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून ६० वर्षांवरील २१,३६,६३८ लाभार्थी बूस्टर डोससाठी पात्र ठरले होते. त्यातील १५,२६,९३३ म्हणजे ७१.४६ टक्के लाभार्थींनी १२ मेपर्यंत बूस्टर डोस घेतला. शनिवारी हीच आकडेवारी १०० टक्क्यांवर गेली. दरम्यान, राज्यात सुमारे १० टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु बूस्टर डोस पात्र लाभार्थी अपेक्षित लोकसंख्येपेक्षा वेगळे आहेत. १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारे ३९ दिवसांचा निकष पूर्ण करत असल्याने त्यांचे बूस्टर डोस पूर्ण झाल्याचे राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06271 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top