पालिका आपत्तींसाठी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका आपत्तींसाठी सज्ज
पालिका आपत्तींसाठी सज्ज

पालिका आपत्तींसाठी सज्ज

sakal_logo
By

महापालिकेतर्फे समन्वय आढावा
मुंबई : कोणत्याही आपत्तीच्या वेळी बचाव कार्यात गुंतलेल्या एजन्सींमध्ये परस्पर समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. एजन्सींमधील समन्वयाचा अभाव बचाव कार्यात अडथळा आणतो आणि काही महत्त्वाच्या तासांमध्ये जास्तीत जास्त जीव वाचवणे आव्हानात्मक बनते. आता ही कमतरता दूर करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. पालिकेने आपत्तीच्या वेळी परस्पर समन्वय आणि देखरेखीसाठी रुग्णालयांमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह १३ रुग्णालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा आर्किटेक्चरल आराखडा बनवण्याचे काम जवळपास सुरू झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06380 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top