संपात सहभागी न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यावर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपात सहभागी न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यावर बहिष्कार
संपात सहभागी न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यावर बहिष्कार

संपात सहभागी न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यावर बहिष्कार

sakal_logo
By

संपात सहभागी न झालेल्या
एसटी कर्मचाऱ्यांवर बहिष्कार
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी साडेपाच महिने संप केला होता. या संपात जवळपास ७५ टक्के एसटी कर्मचारी सहभागी झाले होते; मात्र काही कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होते; मात्र संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना संपकरी कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. मुंबई सेंट्रल येथील वरिष्ठ लिपीक लक्ष्मण महाडिक यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. एवढंच नव्हे, तर त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छही दिले नसल्याचा प्रकार समोर आला. एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातील पाच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ३१ मे रोजी आयोजित केला होता. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेटा बांधण्यात आला; मात्र लिपिक महाडिक संपात सहभागी न झाल्याने त्यांना जाणीवपूर्वक फेटा बांधण्यात आला नाही. तसेच त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छही दिले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06597 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top