
न्यायालयात सुनावणीदरम्यान पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न
पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : सुनावणीसाठी आलेल्या एका पक्षकाराने शुक्रवारी अचानक भर न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रसंग टळला. संपत्तीच्या वादातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या नऊ क्रमांकाच्या न्यायालयात सकाळी ५५ वर्षीय तुषार शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. शिंदे यांच्या प्रकरणावर क्रमांक दोनवर सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेले निर्देश विरोधात गेल्यामुळे शिंदे अत्यंत निराश झाले. दाराबाहेर पडण्याऐवजी ते पुन्हा न्यायालयात शिरले आणि स्वतःजवळ असलेल्या छोट्या कटरने त्यांनी हातावर तीन वार केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे सारेच भांबावले; परंतु बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06984 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..