
बेहरामपाड्यातील झोपड्यांच्या सर्वेक्षणाला गतीला
बेहरामपाड्यातील झोपड्यांच्या सर्वेक्षण
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मुंबईतील झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यानुसार वांद्रे पूर्व येथील बेहरामपाड्यातील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या सर्वेक्षणाला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बेहरामपाड्यातील एसआरए प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे. वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकासमोरील अनंत काणेकर मार्गावरील बहुमजली झोपड्या असलेला बेहरामपाडा सर्व मुंबईचे लक्ष वेधून घेतो. येथे हजारो झोपड्या आणि दाट लोकवस्ती असून मोठ्या प्रमाणात झोपड्यांवर अतिक्रमणे झाली असल्याने हा परिसर बकाल झाला आहे. या ठिकाणी एसआरए योजना राबवण्यासाठी रहिवासी प्रयत्नशील आहेत. मुंबईतील झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम एसआरए प्राधिकरणाने हाती घेतले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07077 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..