नुकसान भरपाईतील आईचा हिस्सा मुलांना लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान भरपाईतील आईचा हिस्सा मुलांना लागू
नुकसान भरपाईतील आईचा हिस्सा मुलांना लागू

नुकसान भरपाईतील आईचा हिस्सा मुलांना लागू

sakal_logo
By

नुकसान भरपाईतील आईचा हिस्सा
मुलांना लागू; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुंबई : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांच्या नुकसान भरपाईची आईच्या हिश्‍श्‍याची रक्कम मुलांना मिळू शकते, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आईचे निधन झाल्यामुळे आणि मुलांना त्यांचा वाटा मिळाल्यामुळे ही रक्कम मुलांना मिळू शकत नाही, असा रेल्वे तक्रार निवारण मंचचा निकाल न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
याचिकादार मुलांनी मृत आईच्या आणि आजीच्या हिश्श्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. त्यांच्या वडिलांचे मार्च २००९ मध्ये रेल्वेतून पडून निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांनी तक्रार निवारण मंचाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंचाने मंजूर करून दामोदर पायगोडे यांच्या पत्नी, आई आणि दोन मुलांना वारस म्हणून भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरवून दावा मंजूर केला. मंचाने चार लाख रुपये मंजूर केले; मात्र ही रक्कम मिळेपर्यंत आई आणि आजीचे निधन झाले होते. त्यामुळे रेल्वे विभागाने फक्त दोन्ही मुलांना त्यांचा हिस्सा दिला होता. त्याचबरोबर आई आणि आजीची दीड लाख आणि एक लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी नकार दिला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची रक्कम मिळू शकत नाही, असे विभागाकडून सांगण्यात आले. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07157 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top