निर्देशांकांमध्ये अल्प घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांमध्ये अल्प घट
निर्देशांकांमध्ये अल्प घट

निर्देशांकांमध्ये अल्प घट

sakal_logo
By

निर्देशांकांमध्ये अल्प घट
मुंबई ः जागतिक शेअर बाजार नरमगरम असल्याने आज भारतीय शेअरबाजारही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. निफ्टी १८.८५ अंश, तर सेन्सेक्स ८.०३ अंश घसरला.
अमेरिकेचा जीडीपी कमीच राहील, अशी शक्यता समोर आल्याने आज युरोपीय व अमेरिकी शेअरबाजार मंदीतच होते. जागतिक प्रतिकूल परिस्थितीची भीती अद्याप सर्वत्र आहे. अशा स्थितीत ठोस सकारात्मक संकेतांअभावी भारतीय शेअरबाजारही फार नफा दाखवू शकले नाहीत. दिवसअखेर सेन्सेक्स ५३,०१८.९४ अंशांवर, तर निफ्टी १५,७८०.२५ अंशांवर स्थिरावला. आज धातूनिर्मिती कंपन्या, वाहननिर्मिती कंपन्या व आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली; तर बँका आणि वित्त संस्थांचे शेअर तेजीत होते. टेक महिंद्र, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव दीड ते दोन टक्के घसरले; तर अॅक्सीस बँक, स्टेट बँक, कोटक बँक, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज लॅब या शेअरचे भाव वाढले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07246 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top