मराठी फलकांबाबत भूमिका स्पष्ट करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी फलकांबाबत भूमिका स्पष्ट करा
मराठी फलकांबाबत भूमिका स्पष्ट करा

मराठी फलकांबाबत भूमिका स्पष्ट करा

sakal_logo
By

राज्य सरकारने मराठी फलकांबाबत
भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
मुंबई : दुकाने आणि इतर आस्थापनांना मराठी पाट्या लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. याबाबत २० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश आज उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. असे असले, तरी या कालावधीत यासंबंधीच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दुकाने आणि आस्थापनेवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती केली आहे. या निर्णयाला आहार या हॉटेलचालक संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर शुक्रवारी न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती एम. सी. शेवलीकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महापालिकेने मराठी पाट्या लावण्याबाबत ३१ मेपर्यंत मुदत दिली होती. आता आणखी सहा महिने हा अवधी वाढवून द्यावा, अशी मागणी आहारच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07397 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top