अनिल परब यांच्या विरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परब यांच्या विरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका
अनिल परब यांच्या विरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

अनिल परब यांच्या विरोधात सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By

अनिल परब यांच्याविरोधात
सोमय्या यांची याचिका
मुंबई, ता. ८ : दापोलीमधील रिसॉर्टच्या बांधकामामुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात आता भाजपचे किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी तपासाची मागणी त्यांनी केली आहे.
परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. आता याबाबत त्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपासाची मागणी केली आहे. सीबीआय, ईडी किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत यावर चौकशी करावी, संबंधित कथित अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त करावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ॲड. अखिलेश दुबे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेचा शुक्रवारी उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने यावर २२ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07398 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top