लवकरच रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवकरच रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार
लवकरच रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार

लवकरच रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार

sakal_logo
By

रिक्षा भाडेवाढ लवकरच
मुंबई : गेल्या सरकारमध्ये रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा रखडलेला प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी रिक्षा, टॅक्सी संघटनांशी चर्चा सुरू असून, खटूवा समितीच्या भाडेवाढीच्या शिफारशी नुसार ही भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षा २ तर टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढणार असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. इंधनाच्या दरात कपात झाली मात्र, सीएनजीच्या दराने उच्चांक घेतला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात आहे. त्यामुळे खटुवा समितीच्या भाडेवाढीच्या शिफारशीनुसार टॅक्सी ३ तर रिक्षा २ रुपये वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07408 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top