
अमेरिकी चलनवाढीचा शेअरबाजाराला फटका
अमेरिकी चलनवाढीचा शेअरबाजाराला फटका
मुंबई : अमेरिकेत झालेल्या चलनवाढीनंतर दरवाढीच्या भीतीमुळे आज मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात घसरण झाली. सेन्सेक्स ९८ अंश तर निफ्टी २८ अंश घसरला. भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र सध्यातरी समाधानकारक असल्याने आज व्यवहार सुरू होताना शेअर बाजार नफा दाखवित होते; मात्र हळूहळू सर्वच जागतिक बाजारांवर अमेरिकी नकारात्मक अर्थव्यवस्थेचे सावट पसरल्यामुळे सर्वत्र नफारुपी विक्री सुरू झाली. भारतीय शेअर बाजारही त्यापासून अलिप्त राहिले नाहीत. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ५३,४१६.१७ अंशांवर व निफ्टी १५,९३८.६५ अंशावर स्थिरावला. निफ्टी मधील १,२६८ शेअर तोटा दाखवीत होते तर ६६६ शेअर नफ्यात होते. आज आयटी कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली व औषध कंपन्यांचे शेअर तेजीत होते. विप्रो, अल्ट्राटेक, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, आयटीसी या शेअरचे भाव एक ते दोन टक्के घसरले. तर दुसरीकडे डॉक्टर रेड्डीज लॅब, सनफार्मा, कोटक बँक, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन या शेअरचे भाव एक ते सव्वा दोन टक्के वाढले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07519 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..