इलेक्ट्रीक बस प्रकरणात महापालिकेला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रीक बस प्रकरणात महापालिकेला दिलासा
इलेक्ट्रीक बस प्रकरणात महापालिकेला दिलासा

इलेक्ट्रीक बस प्रकरणात महापालिकेला दिलासा

sakal_logo
By

ई बस निविदा प्रक्रियेला स्थगिती
मुंबई : शहर आणि उपनगरांसाठी १४०० इलेक्ट्रिक बसची निविदा प्रक्रिया महापालिकेने नव्याने राबवण्यचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. महापालिकेने नागरिकांसाठी सुमारे १४०० इलेक्ट्रिक बसच्या निर्मितीसाठी रीतसर जाहीर निविदा प्रक्रिया केली होती. हैदराबादमधील ‘इवे ट्रान्स. प्रा. लि.’ कंपनीला बस निर्मितीचे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र निर्णय प्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे टाटा मोटरसह अन्य एका कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवायला हवी, असे मत उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे महापालिका आणि इवेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालाला पुढील सुनावणीपर्यंत तूर्तास स्थगिती दिल्याचे स्पष्ट करत जर कंपनीने काही बसचा पुरवठा केला असेल, तर याचिकेच्या निकालावर त्याचे भविष्य ठरेल, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07563 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..