रुपया ८० पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुपया ८० पार
रुपया ८० पार

रुपया ८० पार

sakal_logo
By

रुपया ८० पार; घसरण सुरूच
मुंबई : आयातदारांकडून अमेरिकी डॉलरची वाढती मागणी व कच्च्या तेलाच्या भावातील वाढ यामुळे आजही रुपयाची घसरण सुरुच राहिली. त्यामुळे रुपयाचे मुल्य ८० च्या पलिकडे गेला आहे. व्यवहारांना सुरुवात होताना रुपयाची किंमत ७९.९१ एवढी होती, पण नंतर त्यात चढउतार सुरु झाले व तो कालच्या तुलनेत १३ पैशांनी घसरून ८०.०५ वर स्थिरावला. मंगळवारी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून बाजारात डॉलर विकल्याने रुपया सुधारला होता, मात्र आज त्याची पुन्हा घसरण झाली. भारताची परकीय चलनाची गंगाजळी आज ५८० अब्ज अमेरिकी डॉलरहून जास्त होती. परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांनी मंगळवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये ९७६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07656 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top