
खाद्यतेलाच्या वजनावरून ग्राहकांची फसवणूक टळणार
खाद्य तेलांच्या पाकिटावर आता
निव्वळ वजन वा लिटरचा उल्लेख
मुंबई ः जास्त तापमानाला जादा घनता आणि जास्त वजन निर्माण झालेले खाद्य तेल पॅक करून प्रत्यक्षात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तेल कंपन्यांना केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने चाप बसणार आहे. आता तेलाच्या पाकिटावर फक्त निव्वळ वजन वा लिटर यांचाच उल्लेख करावा (तापमानाचा नाही), असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. ‘द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांनी ही माहिती दिली. याबाबत असोसिएशननेच केंद्रीय ग्राहक संरक्षण खात्यांतर्गत वजनमापे विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर विभागाने नुकताच हा आदेश काढला आहे. काही कंपन्या सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानात खाद्य तेल पॅक करतात. पॅकिंग करतानाचे वाढीव तापमान खोक्यावर लिहून त्या तापमानाला पॅकिंग करताना त्यात एक लिटर तेल असल्याचे नमूद करतात; मात्र वाढीव तापमानाला तेलाची घनता वाढत असल्याने त्याचे आकारमान-वजनही वाढते, पण त्याचे तापमान सर्वसामान्य झाले की त्याची घनता, आकारमान आणि वजन कमी होते. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्षात कमी तेल मिळते. आता ही फसवणूक थांबणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07662 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..