निर्देशांकाची तेजी संपुष्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकाची तेजी संपुष्टात
निर्देशांकाची तेजी संपुष्टात

निर्देशांकाची तेजी संपुष्टात

sakal_logo
By

शेअर निर्देशांकांच्या तेजीला खिळ
मुंबई ः आठवडाभर सुरू असलेली भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची तेजी सोमवारी संपुष्टात आली. कोणतेही सकारात्मक संकेत नसल्यामुळे व जागतिक बाजार संमिश्र असल्यामुळे भारतीय सेन्सेक्स तब्बल ३०६.०१ अंशांनी, तर निफ्टी ८८.४५ अंशांनी कोलमडला. रिलायन्सचे निकाल बरे असले तरी ते बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्याने रिलायन्सच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी, दोन्ही निर्देशांक गडगडले. अन्य मोठ्या कंपन्यांचे निकालही संमिश्र आल्यामुळे बाजारात फारसा उत्साह नव्हता. निर्देशांकाच्या चढ-उतारात धातूनिर्मिती आणि आयटी कंपन्यांचे शेअर वाढले, तर वाहननिर्मिती आणि औषधनिर्मिती कंपन्यांच्या शेअरनी तोटा दाखवला. दिवसअखेर सेन्सेक्स ५५,७६६.२२ अंशांवर, तर निफ्टी १६,६३१ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील मुख्य ३० पैकी १७ शेअरचे भाव सोमवारी घसरले, तर निफ्टीच्या प्रमुख पन्नासपैकी ३१ शेअरचे भाव कमी झाले. महिंद्र आणि महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज व मारुती या शेअरचे भाव अडीच ते चार टक्क्यांच्या आसपास घसरले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07749 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top