सहा आठवड्यात प्रगती अहवाल द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा आठवड्यात प्रगती अहवाल द्या
सहा आठवड्यात प्रगती अहवाल द्या

सहा आठवड्यात प्रगती अहवाल द्या

sakal_logo
By

लोगो पानसरे हत्या प्रकरण

एटीएसने सहा आठवड्यात
प्रगती अहवाल दाखल करावा
उच्च न्यायालयाचे आदेश; पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने सहा आठवड्यात प्रगती अहवाल दाखल करण्याचे निर्देश शनिवारी दिले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सहा वर्षांनंतर नुकताच एक विशेष पथक नव्याने नियुक्त केले आहे. यात एटीएसच्या दहा तर गुन्हे शाखेच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पानसरे यांच्या हत्येचा तपास यापूर्वी विशेष पथकाकडे होता; मात्र मागील सहा वर्षांत कोणतेही विशेष धागेदोरे तपासात उघड झाले नाही, असा आरोप पानसरे यांच्या मुलीने अर्जाद्वारे केला आहे. तसेच तपासासाठी एटीएसचे पथक नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे वर्ग केला आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनीत अगरवाल यांच्या देखरेखीखाली एटीएसचे १० अधिकारी आणि आधीच्या राज्य सीआयडी एसआयटीचे तीन अशी १३ सदस्यांची निवड तपासासाठी करण्यात आली आहे.
राज्य सरकारतर्फे ॲड. अशोक मुंदरगी यांनी पथकाबाबत शनिवारी खंडपीठाला माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश एटीएसला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणीही ३० सप्टेंबरला निश्चित केली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनीही न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. त्यावरही ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.