भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए
भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए
भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए

भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए भुईमूग लागवडक्षेत्र घटले - एसईए

sakal_logo
By

देशभरात भात उत्पादन घटणार
मुंबई : देशाच्या पूर्व व उत्तर-पूर्व भागात पाऊस १६ टक्के कमी पडल्याने तेथे भातपिकाचे उत्पादन कमी होईल, असे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे (एसईए) मावळते अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले. देशात या खरीप हंगामात भुईमूग लागवडीचे क्षेत्र घटले; तर एरंडाचे वाढले आहे, पण मागील वर्षीचे तेलबियांचे उत्पादन आठ लाख मेट्रिक टनांनी कमी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. एसईए ही देशातील तेल उत्पादक आणि तेल व्यापाऱ्यांची सर्वांत मोठी संघटना आहे. तिचे सहा वर्षे अध्यक्ष राहिलेल्या चतुर्वेदी यांनी सदस्यांना लिहिलेल्या पत्रात देशातील तेलबिया उत्पादनाबाबतची परिस्थिती सांगितली आहे. या वर्षीच्या खरीप हंगामातील तेलबियांच्या लागवडीचे क्षेत्र साधारण मागील वर्षीएवढेच आहे, पण भुईमुगाचे क्षेत्र ४.६ लाख हेक्टरने घटले असून एरंडाचे क्षेत्र ६८ टक्के वाढले. सोयाबीनचे क्षेत्र मागील वर्षीच्या ११८ लाख हेक्टरवरून यंदा ११९ लाख हेक्टर झाले; तर एरंडाचे क्षेत्र मागील वर्षी २.८ लाख हेक्टर होते, ते या वर्षी ४.७ लाख हेक्टर झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08285 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..