तात्काळ तिकिटांच्या गैरवापराविरोधात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्काळ तिकिटांच्या गैरवापराविरोधात याचिका
तात्काळ तिकिटांच्या गैरवापराविरोधात याचिका

तात्काळ तिकिटांच्या गैरवापराविरोधात याचिका

sakal_logo
By

रेल्वे तत्काळ तिकिटाचा
गैरपद्धतीने वापर सुरू
उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई, ता. २३ ः रेल्वे प्रवासातील तातडीच्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या तत्काळ तिकीट सेवेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सेवेचा गैरपद्धतीने वापर केला जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालय प्रवाशांसाठी तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट सेवा राबवत आहे. या योजनेंतर्गत ज्या प्रवाशांना तातडीने किंवा कमी दिवसांच्या अवधित प्रवास करायचा असतो, त्यांना तत्काळ मधून जादा शुल्काने तिकीट उपलब्ध केले जाते; मात्र आता ही सुविधा गैरपद्धतीने राबवण्यात येत आहे, असा आरोप अजय माहेश्वरी यांनी याचिकेत केला आहे. प्रवाशांना नियमित तिकिटे उपलब्ध करताना त्यातील काही कोटा दिला जात नाही आणि मग तिच तिकिटे तत्काळच्या नावाखाली जादा शुल्क आकारून घ्यावी लागतात, असा आरोप केला आहे. तत्काळची तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या काही दिवस आधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे; मात्र तसे न होता कृत्रिम टंचाई निर्माण करून नियमित तिकिटे आरक्षित करतानाच तत्काळची तिकिटे विकली जातात, असे याचिकेत निदर्शनास आणले आहे.
चौकट
रेल्वेला बाजू मांडण्याचे आदेश
प्रवासास पुरेसा अवधी असतानाही नियमित कोट्यातून तिकिटे मिळाली नाहीत; मात्र त्यामुळे त्यांनी तत्काळमध्ये रुपये ४०५; तर प्रीमियम तत्काळमध्ये रुपये ९८० अशा शुल्कात तेच तिकीट उपलब्ध होते. यावरून रेल्वे विभाग जाणीवपूर्वक प्रवाशांना जादा दराने तत्काळ तिकीट देत आहे, असा दावा याचिकेत केला आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने रेल्वे विभागाला नोटीस बजावली असून, चार आठवड्यांत बाजू मांडण्याचे आदेश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08309 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..