आईसोबत राहण्याची परवानगी द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईसोबत राहण्याची परवानगी द्या!
आईसोबत राहण्याची परवानगी द्या!

आईसोबत राहण्याची परवानगी द्या!

sakal_logo
By

आईसोबत राहण्याची
परवानगी द्यावी
इंद्राणी मुखर्जीच्या मुलीची याचिका
मुंबई, ता. १ : गेली अनेक वर्षे आईपासून दूर राहत असल्यामुळे मला माझ्या आईबरोबर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विधी मुखर्जीने विशेष न्यायालयात केली आहे. विधी ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी असून शीना बोराची सावत्र बहीण आहे.
विधी सध्या शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. ती शीना बोरा हत्या खटल्यातील साक्षीदार असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. इंद्राणी मुखर्जी या प्रकरणात प्रमुख आरोपी असून सध्या ती जामिनावर बाहेर आहे. विधी या महिन्यात भारतात परतणार आहे आणि त्या वेळी तिने आईबरोबर राहण्याची तिची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र या कायदेशीर पेचामुळे तिने न्यायालयात रीतसर परवानगी अर्ज केला आहे. याबाबत सीबीआयने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने मंगळवारी (ता. ३०) दिले. यावर विशेष न्या. एस. पी. नाईक-निंबाळकर यांच्यापुढे ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सन २०१५ मध्ये इंद्राणीला अटक झाली होती, त्या वेळी विधी ही अल्पवयीन होती. भावनिक दृष्टीने मला आईच्या प्रेमाची गरज आहे. ती आजारी असते आणि तिची काळजी घ्यायला अन्य कोणी नाही. त्यामुळे मला तिच्यासोबत राहायला मिळावे, अशी मागणी तिने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08500 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..