समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश-स्टिंग-रेचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश-स्टिंग-रेचा धोका
समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश-स्टिंग-रेचा धोका

समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश-स्टिंग-रेचा धोका

sakal_logo
By

जेलीफिश, स्टिंग रेचा वावर
मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिश आणि स्टिंग-रे मासे आल्याचे सांगितले जात आहे. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी काही भाविकांना माशांचा दंशही झाला होता. त्यामुळे समुद्रकिनारी जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साधारणतः पावसाळ्यामध्ये मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिश आणि स्टिंग-रे माशांचा वावर असतो. यापूर्वीदेखील अनेकांना माशांचा दंश झाला आहे. यंदाही मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये जेलीफिश आणि स्टिंग-रे मासे अडकल्याने समुद्रामध्ये या माशांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समुद्रात होणाऱ्या गणपती विसर्जनावर या माशांचे सावट जाणवत आहे. गिरगाव आणि जुहू चौपाट्यांवर या माशांचा वावर अधिक असतो. जुहू चौपाटीवर मात्र अशा घटनेची नोंद झालेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08560 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..