अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन ‘रोबो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन ‘रोबो’
अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन ‘रोबो’

अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन ‘रोबो’

sakal_logo
By

मुंबईत आणखी दोन फायर रोबो
मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन नवीन फायर रोबो दाखल होणार आहेत. त्यामुळे शहराप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आगीच्या गंभीर घटनांच्या वेळी जवानांना मदत मिळणार आहे. दोन रोबोसाठी पावणेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार असून, सप्टेंबरअखेर अग्निशमन दलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. अग्निशमन दलाच्या ताफ्यात २०१९ मध्ये पहिला फायर रोबो दाखल झाला. त्या वेळी त्यासाठी ९८ लाख रुपये खर्च झाला होता. गेल्या तीन वर्षांमध्ये रोबोने उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणूनच आता आणखी दोन रोबो घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला रोबो चीनमधून आणण्यात आला होता. आताचे दोन रोबो युरोपमधून घेण्यात येणार आहेत. युरोपिय देश आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असून त्यांच्याकडे अग्निशमन दलाशी संबंधित उत्पादने चीनच्या तुलनेत अधिक कार्यक्षम बनवली जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08697 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..