अमेरिकेच्या धसक्याने शेअर बाजारात पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेच्या धसक्याने शेअर बाजारात पडझड
अमेरिकेच्या धसक्याने शेअर बाजारात पडझड

अमेरिकेच्या धसक्याने शेअर बाजारात पडझड

sakal_logo
By

शेअर बाजारात पडझड
मुंबई ः अमेरिकेतील चलनवाढ आणि त्यामुळे व्याजदर वाढीची भीती यामुळे आज भारतीय शेअरबाजारात पडझड झाली. सकाळी व्यवहार सुरू होताना तर निर्देशांक जास्तच कोसळले होते, मात्र नंतर ते सावरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स २२४.११ अंशांनी घसरून ६०,३४६.९७ अंशांवर स्थिरावला, तर ६६.३० अंशांनी कोसळलेला निफ्टी १८,००३.७५ अंशांवर बंद झाला. अमेरिकेत चलनवाढ होत असल्यामुळे व त्यामुळे अमेरिकी ‘फेड’तर्फे व्याजदरवाढीचे कठोर उपाय योजले जाण्याच्या भीतीमुळे आज जगातील सर्वच शेअर बाजार नरम-गरम होते. त्यामुळे सकाळी व्यवहार सुरू झाल्यावर तर सेन्सेक्स एक हजार अंश कोसळला होता. मात्र नंतर निर्देशांक सावरले आणि दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,३४६.९७ अंशांवर स्थिरावला, तर निफ्टी १८,००३.७५ अंशांवर बंद झाला. आज एवढी पडझड झाली तरी सेन्सेक्स साठ हजारांवरच बंद झाला; तर निफ्टी मात्र कसाबसा अठरा हजारांची पातळी राखण्यात यशस्वी ठरला. आज बँका, वित्त संस्थांचे शेअर वाढले, तर आयटी शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी २९ शेअर्सचे भाव कोसळले, तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी पंधराचे भाव वाढले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08746 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..