Fri, Feb 3, 2023

अकरावीसाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी
अकरावीसाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी
Published on : 25 September 2022, 2:16 am
अकरावीच्या सात हजार जागा रिक्त
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या सात हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याने या भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी शिक्षण संचालनालयाने पहिल्यांदाच दैनंदिन गुणवत्ता फेरीचे आयोजन केले आहे. ही गुणवत्ता फेरी २५ सप्टेंबरला सुरू होणार असून १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यात विद्यार्थ्यांना सकाळी आठ वाजता नोंदणी करता येईल, तर त्यानंतर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेता येईल. यासाठी महाविद्यालयांना सायंकाळी सहापर्यंत आपले कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिले आहेत.