मतदारांना महागडी पेन भेट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारांना महागडी पेन भेट?
मतदारांना महागडी पेन भेट?

मतदारांना महागडी पेन भेट?

sakal_logo
By

कोकण शिक्षक मतदारसंघासाठीच्या
नावनोंदणीवेळी महागड्या पेनचे वाटप?
मुंबई : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृत्या आखल्या जात आहेत. त्यातच एका उमेदवाराने शिक्षक मतदारांची नोंदणी करताना त्यांना महागड्या पेनचे वाटप करत असल्याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात विधान परिषदेसाठी शिक्षक परिषद, भाजप शिक्षक आघाडी, शिक्षक सेना यांच्यासह मेस्टा आणि इतर काही खासगी संस्थाचालक संघटना मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक संघटनांकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची गणिते आखली जात आहेत. गतनिवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी अधिक मतदार नोंदणी कशी होईल, याकडे उमेदवारांचे लक्ष आहे; मात्र शिक्षक मतदार हा सुज्ञ असल्याने सध्या सुरू असलेल्या पेन आणि इतर प्रलोभनांवर तो नाराजी व्यक्त करत आहे.