लम्पी विषाणूचेही जिनोम सिक्वेन्सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी विषाणूचेही जिनोम सिक्वेन्सिंग
लम्पी विषाणूचेही जिनोम सिक्वेन्सिंग

लम्पी विषाणूचेही जिनोम सिक्वेन्सिंग

sakal_logo
By

लम्पी विषाणूचेही जिनोम सिक्वेन्सिंग
मुंबई : लम्पी आजाराच्या विषाणूतील जनुकीय बदल अभ्यासण्यासाठी नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी काही आवश्यक नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांसह लशीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापनही करता येणार आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी सहा विभागांमधून प्रत्येकी दोन गावातील लसीकरणापूर्वीचे आणि लसीकरणानंतरचे ७, १४, २१ आणि २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित केले जाणार आहे. ते बंगळूर येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्थेलाही पाठवण्यात येत आहेत. राज्यामध्ये ७ ऑक्टोबरपर्यंत ३२ जिल्ह्यांमधील एकूण दोन हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढळला आहे. एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी आतापर्यंत एकूण ३३ हजार ६७५ पशुधन लम्पीमुक्त झाले आहे.