ओबीसी जनमोर्चाचे आज राज्यस्तरीय चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी जनमोर्चाचे आज राज्यस्तरीय चर्चासत्र
ओबीसी जनमोर्चाचे आज राज्यस्तरीय चर्चासत्र

ओबीसी जनमोर्चाचे आज राज्यस्तरीय चर्चासत्र

sakal_logo
By

ओबीसी जनगणनेवर आज चर्चासत्र
मुंबई : ओबीसी समाजाच्या जातिनिहाय जनगणना आणि त्याबाबत आंदोलनाचे धोरण निश्चित करण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई मराठी पत्रकार संघात राज्यव्यापी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, माजी आमदार प्रकाश शेंडगे आदी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या चर्चासत्रात प्रस्थापित समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करण्याबाबत सखोल चर्चा करून निर्णय घेणे, जिल्हा आणि तालुका पातळीवरील संघटना बांधणीचा आढावा घेणे आदी विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे चंद्रकांत बावकर यांनी दिली.