दिवसभरात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण
दिवसभरात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण

दिवसभरात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण

sakal_logo
By

कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार
मुंबई : मुंबईत कोरोनाचा चढ-उतार सुरू असून, रविवारी दिवसभरात १७२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५१ हजार ३४२ वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७३५ वर स्थिरावली आहे. दिवसभरात १०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३० हजार ७४५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज ४५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण ७९,७४,०३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.