‘आयटम’ संबोधणाऱ्या आरोपीला दीड वर्षे कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटम’ संबोधणाऱ्या आरोपीला दीड वर्षे कारावास
‘आयटम’ संबोधणाऱ्या आरोपीला दीड वर्षे कारावास

‘आयटम’ संबोधणाऱ्या आरोपीला दीड वर्षे कारावास

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या
मुंबईतील तरुणास दीड वर्षे शिक्षा
मुंबई : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास मुंबई विशेष न्यायालयाने दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ‘आयटम’ उल्लेख करणे लैंगिक शोषण करण्यासारखे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पीडित तक्रारदार मुलगी २०१५ मध्ये शाळेतून घरी जात असताना हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष पोक्सो न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. मुलीने दिलेल्या जबाबात मैत्रीचा उल्लेख केला नव्हता. तसेच अन्य साक्षीदारांनीदेखील असा उल्लेख केला नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी ही कृती लैंगिक शोषण दिसत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. आरोपी मुलीचा एक महिनाभर पाठलाग करत होता, असेही यावेळी सांगण्यात आले. न्यायालयाने याचीही दखल घेतली आहे. महिलांसोबत होणाऱ्या अशा गैरवर्तनाबाबत ‘रोडसाईड रोमिओं’ना धडा शिकवायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.