स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’
स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’

स्वच्छ नवी मुंबईची हवा ‘प्रदूषित’

sakal_logo
By

नवी मुंबईतही खराब हवा
मुंबई : मुंबईत दरवर्षी फटाकेच नव्हे तर दिवाळीच्या सुट्यांमुळेही शिवाय वाहनांच्या संख्येमुळेही हवा प्रदूषित होते; परंतु मुंबईला लागूनच असलेल्या आणि केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारात नुकताच तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबईत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीपर्यंत पोहोचल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. सोमवारी मुंबई, पुण्याच्या तुलनेत नवी मुंबईची हवा सर्वाधिक प्रदूषित श्रेणीत नोंदवण्यात आली. त्यासाठी सुटीच्या काळात शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे कारण ‘सफर’ या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणाऱ्या संस्थेने नोंदवले आहे.