‘साई रिसॉर्ट’ मालकाला दिलासा नाहीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साई रिसॉर्ट’ मालकाला दिलासा नाहीच!
‘साई रिसॉर्ट’ मालकाला दिलासा नाहीच!

‘साई रिसॉर्ट’ मालकाला दिलासा नाहीच!

sakal_logo
By

दापोलीच्या रिसॉर्टला
दिलासा नाहीच
मुंबई, ता. २४ : दापोलीमधील वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’च्या मालकाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे; मात्र कारवाईची नोटीस मिळल्यावर न्यायालयात दाद मागण्याची मुभा खंडपीठाने दिली. शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्या कथित मालकीचे असलेल्या साई रिसॉर्टवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. यावर कारवाई करण्याची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
राजकीय पक्षांच्या वादात माझ्या मालमत्तेचे नुकसान होत आहे, असा आरोप कदम यांनी याचिकेत केला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे. सोमय्या यांनी देखील उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी याचिका केली असून, न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मालक कदम यांना कारवाईपूर्वी कल्पना द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संबंधित रिसॉर्ट परब यांच्या मालकीचे आहे आणि पर्यावरण नियमांचे पालन न करता बांधण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने तूर्तास कारवाईबाबत कोणताही अंतरिम आदेश दिला नाही; मात्र मालक कदम यांना जेव्हा कारवाईबाबत नोटीस येईल, त्यावेळी न्यायालयात दाद मागण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे.