अफझलखान कबर परिसरात नवीन दोन कबर सापडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अफझलखान कबर परिसरात नवीन दोन कबर सापडल्या
अफझलखान कबर परिसरात नवीन दोन कबर सापडल्या

अफझलखान कबर परिसरात नवीन दोन कबर सापडल्या

sakal_logo
By

प्रतापगडला आणखी
दोन कबरी सापडल्या
प्रशासनाकडून माहिती घेण्यास सुरुवात
महाबळेश्वर, ता. १२ ः छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत असणाऱ्या अफझल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटविले. या ठिकाणी अफझल खानाच्या कबरीबरोबर सय्यद बंडा याची देखील कबर होती. मात्र, हे अनधिकृत बांधकाम पाडताना या दोन्ही कबरींपासून काही अंतरावरच आणखी दोन कबरी कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. दरम्यान, या कबरी नेमक्या कोणाच्या याची माहिती जिल्हा प्रशासन घेत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतापगडावरच्या स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, अफझल खानाच्या बरोबर एक सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो प्रतापगडाच्या रणसंग्रामात मारला गेला, म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाँची कबर, असे म्हटले जाते. ही कबर अफझल खान कबरीपासून २५ फूट लांब आहे, असे स्थानिकांनी सांगितले. दुसरी कबर अफझल खान याच्या कबरीच्या डाव्या बाजूला असलेली कबर ही अलीकडच्या काळातील ख्वाजा मियाँ यांची आहे. ही कबर १८०० शतकातील असल्याचे बोलले जात आहे. ही कबर एका मुस्लिम बॅरिस्टरची आहे. हे ख्वाजा १८०० शतकात बॅरिस्टर ख्वाजा मियाँ हे मुस्लिम धर्माचे असून, पीर फकीर दर्गा अशा गोष्टींना मानत नव्हते, तरी देखील ४० वर्षे अफझल खान कबरीची, दर्गाची पीर फकीर म्हणून सेवा करीत असत. ते अफझल खान कबरीच्या सेवेसाठी आले होते. त्यांचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून उल्लेख केला जातो. अफझल खानाच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.

PNE22T04620
प्रतापगड : अफझल खान कबरीशेजारी शनिवारी सापडलेल्या या दोन कबरी.

....................................