Mon, May 23, 2022

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीला आग
मुंबई-गोवा महामार्गावर एसटीला आग
Published on : 13 May 2022, 2:34 am
महामार्गावर एसटी बस जळून खाक
पनवेल ः महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला आग लागण्याची घटना शुक्रवारी (ता. १३) मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य परिसरात घडली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली; पण यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बस मुंबईकडून महाडकडे निघाली होती. बसमध्ये ५२ प्रवासी होते. आग लागल्याचे समजताच सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. काही वेळेतच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले; पण तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82168 Txt Sindhudurg1
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..