मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही
मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही

मराठी पाट्यांसाठी पालिका आग्रही

sakal_logo
By

मराठी पाट्यांसाठी मुंबईतील
रडारवर पाच हजार दुकाने
मुंबई ः मुंबई महापालिका हद्दीत सर्व दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी ३१ मेपर्यंत कालमर्यादा निश्‍चित आहे. महापालिकेने याबाबत पडताळणीसाठी काही पथकांची नेमणूक केली असून पाच हजार दुकाने महापालिकेच्या रडारवर असल्याची माहिती आहे. त्यानुसार येत्या काळात या दुकानांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपूर्वीच नामफलकांमध्ये बदल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नियमानुसार प्रत्येक आस्थापनेच्या नामफलकावर सुरुवातीला मराठी भाषेचा वापर केलेला असावा, तसेच मराठी भाषेतील टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरापेक्षा कमी ठेवता येणार नाही. याशिवाय ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरवले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापनांवर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिलेली नकोत, अशा पद्धतीने नामफलक प्रदर्षित केलेले असावेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82185 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top