बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणावर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणावर मात
बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणावर मात

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणावर मात

sakal_logo
By

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेव्दारे घटले वजन
मुंबई : लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, नैराश्य आणि स्‍लिप ॲपनियासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या एका रुग्णाचे बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेमुळे वजन कमी झाले. इतर व्याधींवर मात
करण्यातही त्याला यश आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे वजन ३६ किलोंनी कमी झाले. सध्या त्याचे वजन ७५ किलो आहे. २० वर्षांपूर्वी नांदेडमधील एका व्यक्तीचे वजन वाढू लागले होते. ताणतणाव आणि नैराश्यामुळे झोपही लागत नव्हती. परिणामी दररोजच्या कामात व्यत्यय येऊ लागला होता. हळूहळू तब्येत आणखी खालावली. कालांतराने वजन वाढू लागले.
सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेटाबॉलिक ॲण्ड बॅरिॲट्रिक सर्जरीचे चीफ सर्जन डॉ. मनीष मोटवानी यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाने योग्य आहार घेत व्यायामाला सुरुवात केली. त्यांच्यावर लॅप्रोस्कोपिक स्लीव्हगॅस्ट्रेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटाचा आकार कमी करून खाण्याचे प्रमाण मर्यादित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82945 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top