रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आरएफआयडी कार्डला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आरएफआयडी कार्डला स्थगिती
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आरएफआयडी कार्डला स्थगिती

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आरएफआयडी कार्डला स्थगिती

sakal_logo
By

आरएफआयडी कार्डला स्थगिती
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारशेडमधील कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीटीफिकेशन आयडी (आरएफआयडी) कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र कारशेडमधील कामगार जेवण, नाश्ता किंवा इतर कारणांसाठी बाहेर गेल्यास कार्डमुळे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी या कार्डविरोधात परळ कारशेडमध्ये जोरदार आंदोलन केले. या आंदोलानंतर आरएफआयडी कार्डला प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कारशेडमध्ये आधीच बायोमेट्रिक सिस्टम लावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियमित प्रवेशाची नोंद होते. मात्र बऱ्याचदा लांब पल्ल्यावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेट मार्कचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगारांनी या बायोमेट्रिक प्रणालीलाही विरोध केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83066 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..