
उत्तनमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला
बंदीत मच्छीमारी करणाऱ्यांचा
मत्स अधिकाऱ्यावर हल्ला
भाईंदर, ता. ५ : पावसाळ्यात मच्छीमारीला बंदी असतानाही मासळी आणल्याबद्दल हटकले असता मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा प्रकार उत्तन येथे घडला. दरम्यान, याप्रकरणी तीन मच्छीमारांवर उत्तन सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसाळ्यानिमित्त एक जूनपासून मच्छीमारीला बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही उत्तन येथील किनाऱ्यावर काहीजण मच्छीमारी करीत असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्त घालत असलेल्या अधिकाऱ्याला दिसले. याबाबत या अधिकाऱ्याने मच्छीमारांना हे बेकायदा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या मच्छीमारांनी अधिकाऱ्याचे न ऐकता त्याच्याशी हुज्जत घातली. वाद वाढत गेल्यानंतर मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय अधिकारी व दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला, अशी तक्रार उत्तन सागरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन मच्छीमारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तीनही मच्छीमार पसार असल्याची माहिती उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक उबाळे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84739 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..