भिवंडीत कोरेक्स औषधाची बेकायदा विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत कोरेक्स औषधाची बेकायदा विक्री
भिवंडीत कोरेक्स औषधाची बेकायदा विक्री

भिवंडीत कोरेक्स औषधाची बेकायदा विक्री

sakal_logo
By

नशेसाठी वापरला जाणारा औषधसाठा जप्त
भिवंडी ः खोकल्यासाठी औषध म्हणून उपयोगी पडणारे कोरेक्स या औषधाचा वापर नशापान मादक पदार्थ म्हणून भिवंडी परिसरात केला जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई एनसीबीने ठाणे-भिवंडी महामार्गावरील पडघा गावाजवळ एका टेम्पोवर कारवाई करीत लाखो रुपयांच्या कोरेक्‍स औषधाच्‍या बाटल्या जप्त केल्या होत्‍या. ही घटना ताजी असतानाच भिवंडी, शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत, पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या विशेष पथकाने शांतीनगर परिसरातील अवचित पाडा या भागात छापा टाकून बेकायदा विक्री करीत असलेल्या सुमारे ४८ हजार ४०० रुपये किमतीच्या औषधांच्‍या बाटल्या व गोळ्यांचा साठा जप्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85322 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top