शेअरबाजाराची लोळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअरबाजाराची लोळण
शेअरबाजाराची लोळण

शेअरबाजाराची लोळण

sakal_logo
By

शेअर १००० अंशांनी गडगडला
मुंबई, ता. १० ः जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली येत असल्याच्या चिंतेमुळे आज जगातील जवळपास सर्वच शेअर बाजारांनी लोळण घेतली. त्याचे अनुकरण करताना भारतीय शेअर बाजारही आज सुमारे पावणेदोन टक्क्यांच्या आसपास कोसळले. सेन्सेक्स १,०१६.८४ अंशांनी, तर निफ्टी २७६.३० अंशांनी पडला.
या भीतीमुळे काल रात्रीच अमेरिकी शेअरबाजार दोन टक्के पडले होते. त्यामुळे आज आशियाई शेअर बाजारही सकाळीच दोन टक्क्यांच्या आसपास घसरले; तर दुपारी युरोपीय शेअरबाजारही तेवढेच कोलमडले. युरोपीय मध्यवर्ती बँकेने २०११ नंतर प्रथमच दरवाढीचे संकेत दिले आणि विकास दर घटेल असेही सूचित केले. त्यामुळेही गुंतवणूकदारांच्या भीतीमध्ये भर पडली.
भारतीय शेअरबाजारही सकाळी व्यवहार सुरू होतानाच तोटा दाखवीत उघडले व तेथून ते सातत्याने घसरतच गेले. दिवसअखेर सेन्सेक्स ५४,३०४.४४ अंशांवर, तर निफ्टी १६,२०१.८० अंशांवर स्थिरावला. निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३७ शेअर्सचे भाव घसरले; तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २२ शेअरचे भाव घसरले. वित्तसंस्था, आयटी आणि धातू निर्मिती कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली.

स्टॅगफ्लेशनची भीती
स्टॅगफ्लेशनच्या भीतीने आज जगातील सर्वच शेअरबाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी घाबरून जोरदार विक्री केली. स्टॅगफ्लेशन म्हणजे स्टॅगनंट व इन्फ्लेशन यांचे एकत्रिकरण. म्हणजेच विकास ठप्प होणे व चलनवाढीमुळे महागाई होऊन दरवाढ होणे. ही स्थिती दाखविण्यासाठी स्टॅगफ्लेशन हा शब्द वापरण्यात येतो.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85338 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top