
राज्याची रक्तदानात उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र रक्तदानात सर्वात पुढे
मुंबई : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र रक्तदानात सर्वात पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २५ वर्षांत रक्तदानाची टक्केवारी ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या राज्यात १६ लाख ७३ हजार युनिट रक्तसंकलन केले जाते. म्हणजेच रक्तदानात पाच पटीने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. १९९६ मध्ये जवळपास साडेतीन लाख युनिट रक्तसंकलन केले जात होते. तेव्हा ३८ टक्के रक्तदान होत होते. हे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत गेल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेची कामगिरी गौरवास्पद झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, लोकसंख्येतील एक टक्का जनतेने रक्तदान करणे गरजेचे आहे. त्यानुसार, १२ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी १२ लाख ३० हजार युनिट रक्त संकलन झाले पाहिजे. पण, राज्यात १६ लाखांपेक्षा जास्त युनिट रक्तसंकलन केले जाते. म्हणजेच ३० टक्के जास्त रक्तसंकलन होते. तसेच, रक्त केंद्रामध्येही वाढ झाली असून राज्यात एकूण ३६४ रक्त केंद्राची नोंद आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85721 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..