महागृहनिर्माण योजनेला पाच कोटींचा पतपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागृहनिर्माण योजनेला पाच कोटींचा पतपुरवठा
महागृहनिर्माण योजनेला पाच कोटींचा पतपुरवठा

महागृहनिर्माण योजनेला पाच कोटींचा पतपुरवठा

sakal_logo
By

महागृहनिर्माणसाठी पाच हजार कोटी
नवी मुंबई : सिडको महामंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून पाच हजार कोटींचा पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या घरांच्या बांधकामास गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. सिडकोसारख्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या महामंडळास स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे केवळ ६ टक्के व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याजदराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. भरीव पतपुरवठा मंजूर करून स्टेट बॅंक ऑफ इंडियानेही या प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवर आणि व्यवहार्यतेवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85885 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top