प्रारूप मतदार याद्यांसाठी २३ जूनचा मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रारूप मतदार याद्यांसाठी २३ जूनचा मुहूर्त
प्रारूप मतदार याद्यांसाठी २३ जूनचा मुहूर्त

प्रारूप मतदार याद्यांसाठी २३ जूनचा मुहूर्त

sakal_logo
By

मतदार याद्यांची २३ ला प्रसिद्धी
मुंबई ः प्रभाग आरक्षणासह २३६ प्रभागांचे राजपत्र राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. आता त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार याद्या येत्या २३ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांवर १ जुलैपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या दृष्टीने आता राजकीय पक्षासह राज्य निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. त्यासाठी महापालिकांच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यात बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86005 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top