अपहरण झालेल्‍या दोन वर्षीय मुलाची १२ तासांत सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण झालेल्‍या दोन वर्षीय मुलाची १२ तासांत सुटका
अपहरण झालेल्‍या दोन वर्षीय मुलाची १२ तासांत सुटका

अपहरण झालेल्‍या दोन वर्षीय मुलाची १२ तासांत सुटका

sakal_logo
By

अपह्त मुलाची सुटका
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाजवळून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून फरार झालेल्या महिलेला पनवेल तालुका पोलिसांनी १२ तासांत अटक केली आहे. तसेच तिने अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. शेवंता कातकरी असे या महिलेचे नाव असून तिने या मुलाला कोणत्या उद्देशाने पळवून नेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून या महिलेची अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या घटनेतील अपहृत झालेल्या मुलाच्या वडिलांचे नाव राजपाल भोसले असे असून ते पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या फुटपाथवर पत्नी व चार मुलांसह राहतात. गुरुवारी पहाटे राजपाल पत्नी व चार मुलांसह पनवेल रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूकडील बुकिंग कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत झोपला होता. सकाळी ५.४५ वाजता भोसले दाम्पत्य प्रातःविधीसाठी गेले. यादरम्यान त्यांची चारही मुले त्याच ठिकाणी झोपली होती. काही वेळानंतर राजपाल भोसले पत्नीसह त्या ठिकाणी आले असता त्यांना शुहम त्या ठिकाणी नसल्याचे आढळून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86134 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top