
वसई जनता बँकेवर उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व
संघाच्या बॅंकेत ‘बहुजन’ सत्तेत
मुंबई ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ४९ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या वसई जनता सहकारी बँकेवर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलने संपूर्ण विजय मिळवला आहे. संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली होती. एकूण १८,७९८ सभासद मतदार होते. परंतु, निवडणुकीत केवळ २६ टक्के इतके अल्प मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांचाही पराभव झाला आहे. या बँकेवर गेल्या १० ते १२ वर्षांपासून बविआ विचारांचा पगडा वाढत गेला असून गेल्या वेळीही काही संघाच्या कार्यकर्त्यांच्या साथीने बविआ पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलनेच सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा उत्कर्ष पॅनेलविरोधात भाजप निष्ठावान आणि काही संघनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उभ्या केलेल्या ११ उमेदवारांच्या जनता सहकार पॅनेलला आपले खातेही या निवडणुकीत उघडता आले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86430 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..