खारमध्ये सापडले नवजात अर्भक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारमध्ये सापडले नवजात अर्भक
खारमध्ये सापडले नवजात अर्भक

खारमध्ये सापडले नवजात अर्भक

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : मुंबईतील खार पश्चिम भागात मेट्रोच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या पाईपमध्ये नवजात अर्भक आढळून आले आहे. भाभा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खारमध्ये मेट्रोचे काम सुरू असून तिथे मोठे पाईप ठेवण्यात आले आहेत. आज सकाळी कामगार नेहमीप्रमाणे कामावर आले असता त्यांना तिथे एक अर्भक आढळले. खार पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक शीतल मेंडगे यांनी अर्भकाला भाभा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील तपास खार पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86750 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top