लोकलची अचूक माहिती कळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकलची अचूक माहिती कळणार
लोकलची अचूक माहिती कळणार

लोकलची अचूक माहिती कळणार

sakal_logo
By

लोकलची सर्वंकष माहिती ॲपवर
मुंबई : लोकल ट्रेनची वाट पाहाणाऱ्या लाखो प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. आता उपनगरी लोकल ट्रेन कुठे आहे आणि किती मिनिटांत स्थानकात येणार आहे, याची अचूक माहिती मध्य रेल्वेच्या यात्री ॲपवर प्रवाशांना मिळणार आहे. लोकल गाड्यांचे लाईव्ह लोकेश ट्रॅक करता येणार आहे. पुढील महिन्यापासून ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल ट्रेनमध्ये जीपीएस डिव्हार्इस बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२२ मध्ये बेलापूर-खारकोपर विभागात लोकल ट्रेनमधील लावलेल्या जीपीएस डिव्हार्इस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे रियल टाईम स्टेटस यात्री ॲपवर प्रवासी पाहू शकणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87223 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..